लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्यासाठी विनयभंग, व्यापाऱ्यावर गुन्हा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर मध्ये एका मेकअप आर्टिस्टशी लगट करत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहण्यासाठी विनयभंग केल्याच्या कारणावरून व्यापारी संकेत विलास शहा याच्याविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. शहरातील एका पार्लरमध्ये घडलेल्या या प्रकारची चर्चा सुुरू आहे. 
Loading...

शहा याने बुधवारी दुपारी दीडच्या सुमारास संबंधित महिलेच्या पार्लरमध्ये जात तिचा हात पकडत 'तू मला फार आवडतेस, मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही.' मी माझ्या पत्नीसोबत समाधानी नाही. त्यामुळे आपण लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये राहू, असे सांगत तिचा विनयभंग केला. शहा याच्याविरोधात संबंधित महिलेने दिलेल्या तक्रारीवरून विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.