दरीत उडी मारून तरुणाची आत्महत्या

 

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- जामखेड सौताडा येथे रामेश्वर येथील निसर्गरम्य धबधब्याच्या परिसरात फिरण्यासाठी आपल्या कुटुंबासमवेत गेलेला जामखेड येथील राहुल उत्तम शिरसाठ (वय २४, रा. मिलिंदनगर, जामखेड) याने अचानक कड्यावरून दरीत उडी मारून आत्महत्या केली. या वेळी त्याच्यासोबत आलेल्या भावाने ही घटना नंतर नातेवाईकांना कळवली. 


Loading...
याबाबत समजलेली माहिती अशी की, राहुल याच्या भावाचे नवीन लग्न झाले आसल्याने तो भावासह आपल्या कुटुंबासमवेत बुधवारी (२१ नोव्हेंबर) दुपारी सौताडा येथील रामेश्वर धबधबा या ठिकाणी फिरण्यासाठी गेला होता. या वेळी त्याची बहीण व नवीन लग्न झालेली भावजयदेखील त्याच्यासोबत होते. धबधबा ज्या ठिकाणाहून पडतो त्याच्या पलीकडील बाजूला हे कुटुंब पर्यटनाचा आनंद घेत होते. 

या वेळी कुटुंब थोडे पुढे गेल्यावर पाठीमागे असलेल्या राहुलने रामेश्वरच्या या दरीच्या कड्यावरून एक हजार फूट खोल दरीत उडी मारून आत्महत्या केली. त्याने उडी मारल्यानंतर पाठीमागे असलेल्या काही पर्यटकांनी ही घटना त्याच्या कुटुंबीयांना सांगितल्यानंतर हा प्रकार कुटुंबीयांच्या लक्षात आला; मात्र, राहुलने आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.