भाजपच्या सावेडीतील कार्यालयासमोरच तणावाचे वातावरण


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खासदार दिलीप गांधी यांचे पुत्र सुवेंद्र गांधी यांच्या उमेदवारी अर्जावर शिवसेनेचे गिरीश जाधव यांनी आक्षेप घेतल्यानंतर सुवेंद्र गांधी व गिरीश जाधव यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे भाजपच्या सावेडीतील कार्यालयासमोरच तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 
Loading...

महापालिका निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया सावेडीतील तहसील कार्यालयासमोर सकाळी सुरू झाली.छाननी प्रक्रियामुळे या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तरीदेखील गटनेते सुवेंद्र गांधी व गिरीश जाधव यांच्यात शाब्दिक चकमक झाली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.