आर्थिक वादातून श्रीगोंद्यात एकाची आत्महत्या

                       

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आढळगाव शिवारात डोकेवाडी येथे तान्हाजी भुजंग शिंदे (४० वर्षे, तांदळी दुमाला) या मजुराने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन गुरूवारी आत्महत्या केली. त्याच्या खिशात चिठ्ठी मिळाली असून त्यात विजय टांगळ याने माझा घात केला. त्याला सोडू नका, असे लिहिले अाहे. 
Loading...

तान्हाजी हा टांगळ याच्याबरोबर अनेक वर्षांपासून मजुरीची कामे करत होता. त्यातून त्यांची घट्ट मैत्री झाली. टांगळ याने तान्हाजीला २० रोजी पुण्यातील दवाखान्यात नेले होते. दुसऱ्या दिवशी सायंकाळी तांदली येथे आणून सोडले. काही वेळातच तान्हाजी एका दुचाकीवर पुन्हा आढळगाव येथे आल्याचे विजयने पाहिले. 


गुरूवारी सकाळी टांगल राहात असलेल्या घराजवळ भिकाजी डोके यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाला तान्हाजी याचा मृतदेह लटकलेला पहाताच तेथे गर्दी जमली. पोलिसांना त्याच्या खिशात चिट्ठी मिळाली. टांगळ याने माझा घात केला आहे. तो मला दोन लाख रुपये मागत असून माझे त्याच्याकडे एक लाख रुपये आहेत. मी मेल्यानंतर त्याला सोडू नका, असे चिठ्ठीत लिहिले आहे. त्यावरून पोलिसांनी टांगलला ताब्यात घेतले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.