महापालिका निवडणुकीसाठी आ. शिवाजी कर्डिलेंच्या दोन मुली रिंगणात.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिका निवडणुकीत भाजपचे आ. शिवाजीराव कर्डिले यांनी आपल्या दोन मुली निवडणूक रिंगणात उभे करण्याची परंपरा यावेळी कायम ठेवली आहे. राष्ट्रवादीचे आमदार अरूण जगताप यांच्या सुनबाई व राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांच्या पत्नी रिंगणात उतरल्या आहेत.


Loading...
पहिली मुलगी व भानुदास कोतकर याची सुन सुवर्णा कोतकर यावेळी रिंगणातून बाहेर पडल्या असल्या तरी आ. कर्डिले यांनी आपली तिसरी मुली ज्योती अमोल गाडे प्रभाग क्रमांक 4 अ मधून राष्ट्रवादीच्या चिन्हावर उभी केली आहे. 


तर दुसरी मुली शितल जगताप ही प्रभाग क्रमांक 14 अ म्हणून रिंगणात उतरली आहे. शितल जगताप या आमदार अरुण जगताप यांच्या सुनबाई असून आमदार संग्राम जगताप यांच्या त्या पत्नी आहे. मागील निवडणुकीत आ. कर्डिले यांच्या दोन मुली सुवर्णा कोतकर व शितल जगताप या उभ्या होत्या. आता या निवडणुकीत ज्योती गाडे व शितल जगताप रिंगणात उरतल्या आहेत. 
----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.