ट्रॉलीला धडकल्याने अपघातात एक तरुण ठार.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला रिफ्लेक्टर बसविलेले नसल्याने रात्रीच्या अंधारात दुचाकीस्वार ट्रॉलीला धडकल्याने अपघातात एक तरुण ठार झाला. मंगळवारी रात्री नऊ वाजता राहुरी ते राहुरी फॅक्टरी दरम्यान सुतगिरणी जवळ नगर-मनमाड महामार्गावर हा अपघात घडला. दीपक नानासाहेब घुले (वय २७, रा. राहुरी फॅक्टरी) असे मृताचे नाव आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी , उसाने भरलेला ट्रॅक्टर दोन ट्रॉल्या घेऊन राहुरी फॅक्टरीच्या दिशेने जात होता. ट्रॉलीला रिफ्लेक्टर बसविलेले नव्हते. त्यामुळे रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने दुचाकी चालकाने ट्रॉलीला मागून धडक दिली. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. त्याच्या मागे वडील, एक भाऊ व एक बहीण असा परिवार आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.