नामदेव राऊत यांचे समर्थक विधानसभेच्या तयारीत !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- विधानसभा निवडणुकीला अजून अकरा महिन्यांचा अवधी असला तरी कर्जतचे पहिले नगराध्यक्ष व भाजपचे प्रमुख नेते नामदेव राऊत यांचे समर्थक आतापासून विधानसभेच्या तयारीली लागले आहेत. काही उत्साही कार्यकर्त्यांनी दुचाक्यांवर राऊत यांच्या छबीसह भावी आमदार असे स्टिकर्स लावले आहेत. तसेच सोशल मीडियावर काही दिवसांपासून पोष्ट टाकल्या जात आहेत.

Loading...
कर्जत व जामखेड तालुक्यांत राऊत यांच्या नावाचे गु्रप तयार करण्यात आले आहेत. तसेच फेसबुकसह विविध ठिकाणी समर्थक कर्जत-जामखेडचे भावी आमदार असे उल्लेख करून विविध पोस्ट टाकत असतात. नगर दक्षिण मतदारसंघातून लोकसभेची भाजपची उमेदवारी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांना दिली जाणार आहे, अशी कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे. 

जर खा. गांधी निवडणूक लढविणार नसतील, तर भाजपला उमेदवार शोधावा लागेल. त्यामुळे यावेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनाच भाजप लोकसभेसाठी रिंगणात उतरविणार, अशी चर्चाही सुरू आहे. प्रा. शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली, तर विधानसभेची कर्जत- जामखेडची विधानसभेची उमेदवारी भाजप राऊत यांना देऊ शकते, असा समर्थकांचा दावा आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.