आ.कर्डिले, जगताप पिता-पुत्रांसह राठोड, कदम,सातपुते यांची उद्या हद्दपारी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महापालिका निवडणुकीत कोणताही अनुचित प्रकार होऊ नये म्हणून प्रशासनाने हद्दपारीची कारवाई सुरू केली आहे. नगर तहसीलदार यांनी आज 17 जणांवर हद्दपारीची कारवाई केली. कोतवाली हद्दीतील 16 आणि तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एक जणाचा समावेश आहे. 
Loading...

आमदार शिवाजी कर्डिले, आमदार अरुण जगताप, आमदार संग्राम जगताप, माजी आमदार अनिल राठोड, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप, शिवसेनेचे शहरप्रमुख दिलीप सातपुते, माजी शहरप्रमुख संभाजी कदम, माजी सभापती सचिन जाधव यांच्या हद्दपारीवर शनिवारी (ता. 24) अंतिम आदेश होणार आहे. तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांनी या माहितीला दुजोरा दिला.

कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशोक नेमीचंद लव्हाळे (रा. मोचीगल्ली), मतीन बशीर शेख (रा. जुनाबाजार, भिस्तगल्ली), फैरोजखान सुलेमानखान (रा. तख्ती दरवाजा), विजय रावसाहेब सुंबे (रा. मोहिनीनगर, केडगाव), मोहसीन अफजल पठाण (रा. एकनाथ नगर, केडगाव), 

बाळू शांताराम पाचारणे (रा. केडगाव), नितीन एकनाथ काते (रा. अचानक चाळ, रेल्वे स्टेशन), संदीप दत्तात्रय श्रीयाळ (रा. शिवम टॉकीज, नगर), वैभव भारत सावेकर (रा. गांधी मैदान, नगर), विष्णू बाबूराव दळवी (रा. कुंभारगल्ली, नालेगाव), राजेंद्र बाबासाहेब कोतकर (रा. केडगाव वेस), अनिल काशिनाथ शिंदे (रा. बोहरीचाळ, रेल्वेस्टेशन), तनवीर गुलाब हुसेन बागवान (रा. पटवर्धनचौक, 

आनंदीबाजार), ठकाजी किसन गेनप्पा (रा. गवळीवाडा, सिव्हिल हॉस्पिटल), विशाल रावसाहेब ताठे (रा. माळीवाडा), प्रवीण पंडितराव साठे (रा. हरिजनवस्ती, केडगाव) आणि तोफखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पारंदामूल बागा गौड (रा. जंगूभाई तालीम, नगर) या 17 जणांना हद्दपार करण्यात आले आहे. 

तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांनी विशेष अधिकारांचा वापर करत या 17 जणांना हद्दपार केले आहे. या आदेशाची प्रत स्थानिक पोलीस ठाण्याला रात्री उशिरा तहसील कार्यालयातून रवाना झाली आहे. या आदेशांचे तंतोतंत पालन व्हावे यासाठी तहसील कार्यालयातून तपासणी होणार असल्याची माहिती तहसीलदार शिंदे यांनी दिली.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.