आजारपणाला कंटाळून सातवीत शिकणाऱ्या मुलाची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- श्रीरामपूर तालुक्यातील टाकळीभान येथे इयत्ता सातवीत शिकणाऱ्या संदेश सोमनाथ पंडित या बारा वर्षांच्या मुलाने आजारपणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. 

संदेशची आई एसटी महामंडळात वाहक असून व वडिलांचे गावातच सलूनचे दुकान अाहे. दोघेही कामावर गेल्यावर घरात कोणीच नसल्याचे पाहून संदेशने गळफास घेतला. आजीने हा प्रकार पाहिल्यावर आरडाओरड केल्याने शेजारचे लोक पळत आले. त्यांनी संदेशला तत्काळ श्रीरामपूर येथील गंगाधर ओगले साखर कामगार रुग्णालयात नेले. परंतु उशीर झाल्याने डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
----------------------------
Loading...
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
-------------------------------
Powered by Blogger.