भाजपचे ४ तर शिवसेना-राष्ट्रवादीचा एकेक अर्ज बाद.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारी अर्जांच्या छाननी दरम्यान बड्या राजकीय पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत.

Loading...
 खा. दिलीप गांधी यांचे सुपूत्र सुवेंद्र गांधी व स्नुषा दिप्ती गांधी यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या चार नगरसेवकांचे उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत. तर शिवेसेना व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा प्रत्येकी एक व एका अपक्षाचाही समावेश आहे. शुक्रवारी (दि.२३) पहाटे अडीच वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी हा निकाल जाहीर केला आहे.

अर्ज बाद झालेल्या उमेदवारांमध्ये भाजपच्या सुवेंद्र गांधी, दिप्ती गांधी, प्रदीप परदेशी, सुरेश खरपुडे या चौघांसह शिवसेनेचे उमेदवार व विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उमेदवार योगेश चिपाडे, अपक्ष उमेदवार सय्यद सादीक आरिफ यांचा समावेश आहे. 

तर महापौर सुरेखा कदम, संभाजी कदम यांच्या अर्जावरील हरकती फेटाळून ते अर्ज वैध ठरविण्यात आले आहेत. उमेदवारी अर्ज छाननी दरम्यान अनेक हरकती दाखल झाल्या होत्या. त्यातील प्रभाग ८, ९, १०, ११ व १२ या प्रभातील प्रमुख दिग्गजांच्या अर्जावरील हरकतींचा निर्णय राखून ठेवण्यात आला होता.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.