दहावी, बारावी परीक्षांचं वेळापत्रक जाहीर


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महाराष्ट्र राज्य माध्यमिक (इयत्ता दहावी) आणि उच्च माध्यमिक (बारावी) बोर्डाच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे. बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारी 2019 ते 20 मार्च 2019 या कालावधीत, तर दहावीची परीक्षा 1 मार्च 2019 ते 22 मार्च 2019 या कालावधीत घेण्यात येणार आहे.
Loading...

शिक्षण मंडळाने ऑक्टोबर महिन्यात दहावी बारावीच्या परीक्षांचं संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं होतं. त्या वेळापत्रकात शिक्षण मंडळाने काहीही बदल केले नाहीत. विद्यार्थ्यांना अभ्यासाचं नियोजन करता यावं आणि मनावरचा ताण कमी व्हावा शिक्षण मंडळाने संभाव्य वेळापत्रक जाहीर केलं होतं.

गुरुवार 21 फेब्रुवारी 2019 ते बुधवार 20 मार्च 2019 या कालावधीत बारावीची, तर शुक्रवार 1 मार्च 2019 ते शुक्रवार 22 मार्च 2019 दरम्यान दहावीची लेखी परीक्षा घेण्यात येईल. मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांतर्फे ही परीक्षा घेण्यात येईल.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.