शहराचा रखडलेला विकास करण्यासाठी भाजपा हाच एकमेव पर्याय.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरात भाजपाला चांगले वातावरण आहे.महापालिकेत भाजपची एकहाती सत्ता आपल्याला मिळवायची आहे. त्यासाठी कार्यकर्त्यांनी फक्त हवेत राहू नये, असा सल्ला सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी माळीवाडा येथील भाजपाच्या बैठकीत केले. मंत्री देशमुख यांनी माळीवाडा येथील स्व. कैलास गिरवले यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट देवून कै.गिरवले यांना श्रद्धांजली वाहिली. तसेच गिरवले कुटुंबीयांचे सांत्वन केले.

यावेळी झालेल्या बैठकीत बोलताना मंत्री देशमुख म्हणाले,महापालिका निवडणुकीसाठी आपण ६ दिवस नगरमध्ये तळ ठोकणार आहोत. आज दिवसभर शहरात विविध संस्था, संघटना, सामाजिक कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक यांच्या भेटी गाठी घेतल्या आहेत. सर्वांनाच शहरात परिवर्तन हवे आहे. शहराचा रखडलेला विकास करण्यासाठी भाजपा हाच एकमेव पर्याय असल्याचे सर्वांचे म्हणणे आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.