पाण्याच्या नियोजनात तालुक्याच्या आमदाराला अपयश : शंकरराव गडाख.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- दुष्काळामुळे मुळा धरणाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असतानाही मराठवाड्याला पाणी देण्याचा राजकीय निर्णय झाला. जायकवाडीत ५५ टक्के उपयुक्त पाणीसाठा असताना नगर जिल्ह्यातून पाणी सोडण्यात आले. पाटपाण्याच्या नियोजनात तालुक्याच्या आमदाराला अपयश आले, अशी टीका माजी आमदार शंकरराव गडाख यांनी केली. 
Loading...

आता पुन्हा शेतकऱ्यांसाठी लढा देण्याकरता तयार राहण्याचे आवाहनही त्यांनी केले. चांदे जिल्हा परिषद गटातील सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी मुळा कारखान्याचे संचालक बाबुराव चौधरी यांच्या वस्तीवर झालेल्या फराळाच्या कार्यक्रमास हजेरी लावली. या वेळी गडाख बोलत होते. 

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अशोक गायकवाड होते. गडाख पुढे म्हणाले, माझ्या आमदारकीच्या काळात धरणाच्या पाण्याचे नियोजन कमी पाणी असताना केले होते. विशेष म्हणजे कोणाची हिंमत नव्हती कालव्यावरील पाइप काढण्याची. त्यासाठी लोकप्रतिनिधींत धमक लागते. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज घेऊन पाइपलाइन केल्या आहेत. त्यांचे असे वाटोळे करणार असाल, तर तो शेतकरी कर्ज कसे फेडणार. 

मुळा धरणातील दोन टीएमसी पाणी कारण नसताना गेले. आता आपणच आपल्यासाठी विचार केला पाहिजे. पाटपाण्याचे नियोजनात होण्यासाठी अांदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही. कालव्याची दुरुस्ती होत नसल्याने पाणी शेवटच्या शेतकऱ्यांना मिळाले नाही. हा निधी कोठे आहे, असा सवाल करून संघर्ष करण्यासाठी तयार राहण्याचे आवाहन गडाख यांनी केले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.