नात्यागोत्यासाठी शिवसेनेचा वापर करू नका !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साईबाबा मंदिरात झालेल्या प्रकारा संदर्भात मंदिर प्रमुखांवर दाखल झालेल्या विनयभंगाचा गुन्ह्यातील नातेवाईकास वाचविण्यासाठी शिवसेना पक्षाचा वापर केला जात असुन नात्यागोत्यासाठी शिवसेना पक्षाचा वापर करु नये याबाबतचे प्रसिध्दी पत्रक शिवसेनेचे तालुका प्रमुख संजय शिंदे यांच्या वतीने काढण्यात आले आहे. 
Loading...

तालुका प्रमुख संजय शिंदे यांच्यासह शिवसेना जिल्हा संघटक विजयराव काळे, राहात्याचे उपनगराध्यक्ष राजेंद्र पठारे, शिवसेना शहर प्रमुख सचिन कोते, सुनिल परदेशी, सावळेराम डांगे, शिवाजी चौधरी यांच्या वतीने काढण्यात आलेल्या पत्रकात म्हटले आहे की, साईबाबांच्या पालखी दरम्यान मंदीर प्रमुखाने महिलेचा विनयभंग केल्याबाबत शिर्डी पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबच मोर्चे,प्रतिमोर्चे काढले जात आहेत. यामध्ये कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे,अशी शिवसेनेची भुमिका आहे. या प्रकरणात शिवसेना अद्यापपयंर्त सहभागी झालेली नसुन शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख या स्वत:च्या नातेवाईकांना वाचविण्यासाठी शिवसेना पक्षाच्या नावाचा गैरवापर करत असुन 

विनाकारण पक्षाला आपल्या नातेवाईकांसाठी बदनाम करु पाहत आहेत. जगाला श्रध्दा सबुरीचा संदेश देणाऱ्या साईदरबारात असा निंदनीय प्रकार घडणे शर्मेची बाब आहे. त्यामुळे नातेवाईकांना वाचविण्यासाठी पक्षाचा वापर करु नये.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.