तलवार बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- बेकायदेशीररित्या तलवार बाळगल्याप्रकरणी तरुणास अटक करण्यात आली आहे. सुमीत सुहास शिंदे (रा. गोविंदपुरा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून तलवार जप्त करण्यात आली. 

याप्रकरणी भिंगार पोलिसांनी हे.कॉ. फकीर शेख यांच्या फिर्यादीनुसार गुन्ह्याची नोंद केली आहे. शिंदे याच्याकडे बेकायदेशीररित्या तलवार असल्याची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर आरोपीच्या घरी छापा टाकण्यात आला. छाप्यात शिंदे याच्याकडे बेकायदेशीर तलवार आढळून आल्याने जप्त करण्यात आली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.