हे उमेदवार लढविणार छिंदमविरोधात निवडणूक.

अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- राज्यभराचे लक्ष लागलेल्या प्रभाग '९-क' या जागेवर उभा असलेला वादग्रस्त श्रीपाद छिंदम याच्याविरोधात सर्वच प्रमुख पक्षांनी आपले उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यामुळे नगर महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग ९ मधील 'क' जागा हॉट झाली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द उच्चारल्याने भाजपमधून काढून टाकण्यात आलेला त्यांचा माजी उपमहापौर छिंदम राज्यभरातील शिवप्रेमींकडून टीकेचा धनी झाला आहे. त्याला या वेळी भाजपची उमेदवारी मिळण्याची शक्यता नव्हतीच. त्यामुळे त्याने अपक्ष स्वरूपात उमेदवारी दाखल केली आहे. 


Loading...
त्याने उमेदवारी दाखल करण्याआधी शिवसेनेचे सुरेश तिवारी यांनी '९-क'मधून उमेदवारी अर्ज दाखल केली होती; मात्र, या जागेवर छिंदमने एंट्री केल्यावर त्याचे पहिले प्रतिस्पर्धी म्हणून तिवारीही चर्चेत आले. त्यामुळे या जागेवर अन्य पक्ष कोणाला उमेदवारी देतात, याची उत्सुकता होती. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ती संपुष्टात आली. 

भाजप-राष्ट्रवादी-मनसेचे उमेदवार छिंदम उमेदवारी करीत असलेल्या '९-क' जागेवर सेनेचे तिवारी यांच्यासह आता भाजपकडून प्रदीप परदेशी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून अनिता राठोड व मनसेकडून पोपट पाथरे यांनी उमेदवारी दाखल केली आहे. प्रवीण जोशी यांचाही अपक्ष उमेदवारी अर्ज आहे. याशिवाय आणखीही काही जणांनी याच प्रभागातून उमेदवारी अर्ज केल्याचे सांगितले जाते.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.