गुप्तांगावर वार करून कर्जत मध्ये गुंडाची निर्घुण हत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  पुण्यातून जेलमधून पळालेला कुख्यात आरोपी राहुल गोयकर याची बुधवारी रात्री हत्या झाली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कर्जत तालुक्यात खंडाळा येथे राहणाऱ्या राहुल गोयकर याच्यावर शेकडो गुन्हे दाखल होते. त्यात मागील महिन्यात तो जेलमधून फरार झाला होता. 
Loading...

बुधवारी रात्री 10 वाजता गावातील जुन्या भांडणावरून काही जणांनी लाकडी दांडक्याने त्याला चोपले. डोके, गळा आणि गुप्तांगावर जबर मारहाण करून तसेच डोके ठेचून हत्या करण्यात आली, अशी माहिती देण्यात येत आहे. या हत्येप्रकरणी भाऊसाहेब बबन खंडेकर, बबन किसन खंडेकर, हौसराव गोयकर, संतोष गोयकर, राजेंद्र चौधरी, आणि तीन महिलांवर आरोप करण्यात येत आहे.
----------------------------
Loading...
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.