खासदार गांधीचा पत्ता होणार कट ! लोकसभेसाठी भाजपच्या या नेत्याचे नाव चर्चेत .


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- खासदार दिलीप गांधी यांच्यावर नगर दक्षिणेतील जनता मोठ्या प्रमाणात नाराज असून त्यांना पुन्हा भाजप संधी देण्याची शक्यता कमीच आहे.भाजप मधील वरिष्ठ नेते ही गांधीवर नाराज असल्याने ह्या जागेवर नवा उमेदवार शोधण्याची वेळ भाजपा वर आली आहे. नगर दक्षिणमध्ये यावेळी लोकसभेची उमेदवारी पालकमंत्री राम शिंदे यांना दिली जाणार असल्याची चर्चा मतदारसंघांमध्ये आहे.
Loading...
यावेळी भाजपकडून प्राध्यापक राम शिंदे यांना लोकसभेची उमेदवारी देण्याची शक्यता असल्याचा चर्चेला उधाण आले आहे. पालकमंत्री राम शिंदे मागील वर्षापर्यंत आपण लोकसभेवर मा. मुख्यमंत्री व केंद्रीयमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या प्रमाणे भविष्यात राजकारण करायचे आहे. असे खाजगीत बोलत.

दरम्यान लोकसभेची उमेदवारी मिळाली तर विधानसभेची कर्जत जामखेड ची जागा रिकामी होईल आणि भाजपच्या वतीने नामदेव राऊत यांना उमेदवारी मिळू शकते अशी शक्यता त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
----------------------------
Loading...
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.