तनपुरे -कर्डिले-कराळे यांच्यात राजकीय जुगलबंदी


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- गेल्या काही दिवसापासून राहुरी नगर पाथर्डी विधानसभा मतदार संघाचे आमदार होण्यासाठी राहुरीचे नगराध्यक्ष प्राजक्त तनपुरे यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य अनिल कराळे प्रयत्नशील असल्याची चर्चा आहे. त्यात बाणेश्वर दूध संस्थेचे अध्यक्ष रोहिदास कर्डिले व हे दोन्ही युवानेते करंजीघाट येथील माणिकशहा पिरबाबा यांच्या उरूसाच्या कार्यक्रमानिमित्त एकत्र येवून, त्यांच्यात रंगलेल्या राजकीय जुगलबंदीने उपस्थितांची चांगलीच करमणूक झाली.  
Loading...

यावेळी तनपुरेंबरोबर कराळेंनी देखील माणिकशहा पिरबाबाकडे पुढच्या लढाईत यश मिळू दे म्हणत, आमदारकीसाठी आशीर्वाद मागीतला. मात्र कर्डिलेंनी आत्ताच काहीच मागायचं नाही म्हणत, पिरबाबा पुढे हात जोडले. शिवसेना तालूका प्रमुख रफीक शेख व युवानेते अझर पठाण यांनी या कार्यक्रमाच्या माध्यमातून या युवा नेत्यांना एकाच व्यासपीठावर आणून करंजीच्या राजकारणाला एक वेगळी कलाटणी देण्याचा प्रयत्न केला आहे. 


हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतिक असलेल्या माणिकशहा पिरबाबांचा पाचवा उरूस संदल कार्यक्रम रविवारी करंजी घाट येथे भक्तीमय वातावरणात पार पडला. दुपारी चार वाजता गावातून मिरवणूक निघाली, त्यानंतर सायंकाळी सहा वाजता सामूहिक नमाज पठण झाल्यानंतर जळगाव येथील युसूफ शोला आणि नगर येथील गुलणार निजामी यांच्यात शेरोशायरीसह कवालींचा रंगतदार मुकाबला झाला. 

----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.