ही दोन दाम्पत्य अजमावणार महापालिकेत नशीब !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण आणि शीला चव्हाण, तसेच खासदारपुत्र नगरसेवक सुवेंद्र गांधी आणि दीप्ती गांधी असे दोन दाम्पत्य महापालिका निवडणुकीच्या रिंगणात दिसणार आहेत. काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष दीप चव्हाण निवडणुकीपूर्वी चांगले वादग्रस्त ठरले होते. 
Loading...

राष्ट्रवादीने त्यांच्यापासून चार हात लांब रहायचे ठरवले होेते. त्यामुळे आघाडीची चर्चा करताना काँग्रेसनेही त्यांना दूर ठेवले. असे असताना दीप चव्हाण यांनी मात्र आपले वजन सिद्ध करून दाखविले. स्वतःला प्रभाग 10 मधून आणि पत्नी शीला यांना प्रभाग 9 मधून उमेदवारी मिळविली. माघारीपर्यंत यात काही बदल होतो का, याकडे आता काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. 


चव्हाण यांच्याप्रमाणेच भाजपचे खासदार दिलीप गांधी यांनीही आपल्या घरात दोन उमेदवार्‍या मिळविल्या आहेत. चिरंजीव असलेले नगरसेवक सुवेंद्र गांधी यांना प्रभाग 11 मध्ये आणि त्यांच्या पत्नी दीप्ती यांना प्रभाग 12 मधून उमेदवारी मिळाली आहे. 

दीप्ती गांधी यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दीप्ती गांधी या महापौर सुरेखा कदम यांच्या विरोधात लढणार आहेत. याच प्रभागातून चर्चेत असलेल्या दिवंगत नगरसेवक कैलास गिरवले यांच्या पत्नी निर्मला यांनीही भाजपकडून उमेदवारी दाखल केलेला आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.