काँग्रेस-राष्ट्रवादीला आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- काँग्रेस, राष्ट्रवादीला मराठा, धनगर, मुस्लिम आरक्षणावर बोलण्याचा अधिकार नाही, असे संभाजी ब्रिगेडचे अनंतदादा चोंदे यांनी म्हटले आहे.राहुरी येथे चोंदे याच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर उत्तर जिल्ह्यातील कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. 
Loading...

कार्यक्रमाचे प्रास्तविक जिल्हाध्यक्ष मच्छद्रिं गुंड यांनी केले. याप्रसंगी उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना अनंत चोंदे म्हणाले, सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा राज्यात गाजत आहे. राज्य मागासवर्ग आयोगाने आपला अहवाल सरकारला सादर केला आहे. त्यावरून जो तो आपली राजकिय पोळी भाजायचा प्रयत्न करत आहे. 


कॉँग्रेसची देशात साठ वर्षे सत्ता होती. त्यावेळी त्यांनी मराठा, धनगर, मुस्लीम आरक्षणाचा प्रश्न जाणीवपूर्वक सोडवला नाही. २०१४ साली कॉँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने घाईत मराठा व मुसलीम समाजाला १६-४ अंतर्गत आरक्षणाची घोषणा केली. ते घटनाबाह्य होते. त्यामुळे ते कोर्टात टिकले नाही. 


आताच्या सरकारने देखील मागील सरकारचा कित्ता गिरवायला सुरूवात केली आहे. मराठा समाजाला स्वतंत्र प्रवर्गातून आरक्षण नको आहे. तर कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लावता तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षणाची मर्यादा वाढवून मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यावे,असेही ते म्हणाले.


----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.