नगर शहरात आता मिळणार पाईपलाईन द्वारे घरगुती वापराचा गॅस !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  देशभरातील नागरिकांना पाईप जोडणीद्वारे घरगुती वापराचा गॅस वितरित करण्याची महत्त्वाकांक्षी योजना केंद्र सरकारने आखली आहे. याअंतर्गत दि.22 नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील विज्ञान भवनातून अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्ह्यासह भारतातील 63 भौगोलिक क्षेत्रांतील सिटी गॅस वितरण प्रकल्प उभारणीचा शुभारंभ करणार आहेत. 

Loading...
व्हिडिओ स्ट्रिमिंगव्दारे हा कार्यक्रम एकाच वेळी देशभरातील सिटी गॅस वितरण प्रकल्पाच्या ठिकाणी होणार आहे. नरेंद्र मोदी यांच्यासमवेत विज्ञान व तंत्रज्ञान, भूगर्भ विज्ञान व पर्यावरण, वन व हवामान बदल खात्याचेे मंत्री डॉ.हर्षवर्धन व पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची उपस्थिती असेल,अशी माहिती भारत गॅस रिसोर्सेस लि.च्या अधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत दिली.

नगरमध्येही दुपारी 3 वाजल्यापासून नगर-मनमाड रोड नागापूर परिसरातील सिध्दी लॉन येथे या कार्यक्रमाचे लाईव्ह स्ट्रिमिंग होणार आहे. नगरमधील या कार्यक्रमास रेल्वे मंत्री पियुष गोयल, खा.दिलीप गांधी, आ.संग्राम जगताप यांची प्रमुख उपस्थिती राहील. 

अहमदनगर आणि औरंगाबाद जिल्हा विभागातील सिटी गॅस डिस्ट्रीब्युशन नेटवर्कसाठी भारत गॅस रिसोर्सेस लिमिटेडला प्राधिकृत करण्यात आले आहे. या दोन जिल्ह्यांमध्ये 106 सीएनजी स्टेशन प्रस्तावित असून पाईप नैसर्गिक वायू अर्थात पीएनजीचा लाभ सुमारे 7 लाख 8 हजार 100 कुंटुंबांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.