आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेत दोन वेगवेगळ्या ठिकाणी एकूण सात जणांकडून आचारसंहिता भंग झाल्याच्या घटना घडल्या आहे. महापालिकेच्या वॉर्ड क्र. तीनमधून भाजपच्या तिकिटावरून जुबेर सय्यद व राष्ट्रवादीच्या तिकिटावरून समदखान निवडणुकीस उभे आहेत. 


Loading...
यातील जुबेर सय्यदचा भाऊ नदीम व त्याचा पुतण्या बिलाल सय्यद हे दोघे नगर येथून त्यांचे काम आटोपून घराकडे जात असता मुजीबखान ऊर्फ भुऱ्या व त्याचे तीन अनोळखी साथीदार यांनी दोघांना अडवून त्यांच्या अंगावर धावून आले व अश्लील भाषेत शिवीगाळ करत धमकी दिली. याप्रकरणी कॅम्प पोलिसांनी नदीम सय्यद याच्या फिर्यादिवरून गुन्ह्याची नोंद केली आहे. 

वार्ड क्र. सहामध्ये भैय्या वाबळे, रवि पंचमुख (दोघांचे पुर्ण नाव, पत्ता माहित नाही), अमेल नानाभाऊ पंडीत (पत्ता माहित नाही) यांनी महानगरपालिका हद्दीतील रासनेनगर मधील कैलास कॉलनी येथे रस्त्याचे कामास कोणतीही प्रशासकीय मान्यता व कामाचा कार्यालयीन आदेश देण्यात आलेला नसतांना सोमवार (दि. १२) रोजी दुपारी अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण केले. याप्रकरणी तोफखाना पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
----------------------------
Loading...
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.