अनोळखी पुरूषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर तालुक्यातील दौलावडगांव रस्त्यावर चिचोंडी शिवारात अनोळखी पुरूषाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला. पोलिस पाटील संतोष खराडे यांनी नगर तालुका पोलिस ठाण्यात खबर दिली. 


Loading...
पोलिस उपअधीक्षक अरूण जगताप, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक दिलीप पवार व नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक किरण शिंदे यांनी असून घटनास्थळी येऊन पाहणी केली. 

यावेळी तालुका पोलीस ठाण्याचे पीएसआय पवार आरडी व पीएसआय एसडी पालवे,पो.कॉ.अशोक मरकड, तनमर,साब्बील शेख उपस्थित होते. मृत व्यक्तीच्या हातावर बबन नाव गोंदले असल्याची माहिती पोलीसांनी दिली. नगर तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलिस हवलदार बापुसाहेब फोलानी पुढील तपास करत आहेत.
----------------------------
Loading...
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.