केडगावचे राजकारण भाजपला त्रासदायक ठरणार ?


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजपने केडगावमध्ये काँग्रेसच्या उमेदवारांना पक्षात घेऊन उमेदवारी देत केलेल्या भूकंपाचे पडसाद दुसर्‍या दिवशी केडगावमध्ये उमटले असून भाजपच्या निष्ठावंतांनी राजीनामास्त्राचे उपसले आहे. भाजपचे केडगाव मंडल सरचिटणीस सचिन चोरडिया व शहर उपाध्यक्ष धनंजय जामगांवकर यांनी नगर शहर जिल्हाध्यक्ष तथा खासदार दिलीप गांधी यांच्याकडे पदाचे राजीनामे पाठविले आहेत.


Loading...
सचिन शांतीलाल चोरडिया (रा. भूषणनगर, केडगाव) यांनी या राजीनाम्यात म्हटले आहे की, महापालिका निवडणुकीत केडगाव येथील प्रभाग 16 व 17 संदर्भात मंडलाला विश्वासात न घेता जे उमेदवार दिले आहेत, त्याबाबत मी सहमत नाही. हे नामधारी पद मिरवण्याची माझी इच्छाही नाही. त्यामुळे मी स्वखुशीने केडगाव मंडल सरचिटणीस या पदाचा राजीनामा देत आहे.

धनंजय जामगांवकर यांनी या राजीनाम्यात म्हटले आहे, प्रभाग 16 मध्ये भाजपकडून सर्वसाधारण जागेसाठी स्वत: उमेदवारी अर्ज भरला आहे. मला पक्षाचा कोणताही एबी फॉर्म मिळाला नाही. मी केडगावमध्ये गेली 25 वर्षांपासून भाजपचा संस्थापक कार्यकर्ता आहे. जगन्नाथ निंबाळकर तसेच अन्य इतर कार्यकर्ते आहेत.


मी सन 1994 पासून भाजपचा तालुका कार्यकारिणी सदस्य, चिटणीस, उपाध्यक्ष व सध्या शहर जिल्हा उपाध्यक्ष या पदावर आहे. मला व शहर जिल्हा सरचिटणीस निंबाळकर यांना विश्वासात न घेता येथे कोणाशी चर्चा केली व पक्षाचा एबी फॉर्म कोणाला दिला हे कळले नाही. असे असेल तर भाजप उपाध्यक्ष पदावर राहणे मला योग्य वाटत नाही. त्यामुळे राजीनामा देत असल्याचे जामगांवकर यांनी म्हटले आहे.
----------------------------
Loading...
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.