भीषण अपघातात कोपरगावच्या एकाच कुटुंबातील ६ जणांचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नाशिक जिल्ह्यातील येवला-मनमाड महामार्गावर अनकाई बारी येथे कार आणि ट्रकचा भीषण अपघात झाला. यात एकाच कुटुंबातील सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातात मृत्यूमुखी पडलेल्यांमध्ये तीन महिला, दोन पुरुष आणि एका लहान मुलाचा समावेश आहे.

मृतांमध्ये सगळेच अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगावचे रहिवासी होते. घटनास्थळावरून आलेल्या छायाचित्रांवरून अपघात किती गंभीर होता हे दिसून येते. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, भल्या पहाटे हा अपघात घडला.
Loading...
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Powered by Blogger.