बाजारभाव कोसळल्याने कांदा उत्पादक अडचणीत.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कांद्याचे भाव कोसळल्याने कुकडी डावा कालवा लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांपुढे आर्थिक संकट उभे राहिले अाहे. याचा बाजारपेठेवरही मोठा परिणाम झाला अाहे. सरकारने कांद्याला २५ रुपये किलो भाव देऊन शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी होत आहे. 


Loading...
कुकडी लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांना चार महिन्यांत येणाऱ्या कांदापिकापासून चांगला फायदा मिळत असला, तरी अनेकदा तोटाही सहन करावा लागतो. क्वचितच कांद्याचे भाव वाढल्यानंतर शहरी ग्राहक ओरड करतात. नाईलाजाने सरकारला हस्तक्षेप करून निर्यात बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागतो. कधी कधी कांदा आयात करावा लागतो. 

मात्र, कांद्याला सरासरी दहा ते बारा रुपये भाव मिळाला, तरच तो शेतकऱ्यांना व ग्राहकांना परवडतो. कांद्याला किलोला दहा ते पंधरा रुपये भाव राहील असेच धोरण सरकारने ठेवावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. 


कांद्यासाठी हेक्टरी लाखभर खर्च येतो. मशागत, रोपे, लागवड, खुरपणी, पाणी, औषधांची फवारणी, कांदा काढणे, वाहतूक, कांदाचाळ, तसेच योग्य भाव आल्यानंतर व्यापाऱ्यांना देणे यासाठी मोठा खर्च येतो. कांदा काढल्यानंतर एक महिन्याच्या आत विक्रीस गेला व किलोला दहा रुपये भाव मिळाला, तरच शेतकऱ्यांना परवडते. 

कांद्याचे सरकारी धोरण चुकीचे असल्याने कांदा उत्पादक शेतकरी व ग्रामीण भागातील कांदा खरेदी करणारा व्यापारी तोट्यात असून सरकारने शेतकरी हिताचा निर्णय घेण्याची मागणी पारनेर तालुका कांदा व्यापारी संघटनेचे पदाधिकारी संतोष रसाळ यांनी केली आहे. 

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.