पुण्यात पत्नीस भेटू न दिल्याने पतीची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- पत्नीस व मुलास मामेसासऱ्याने भेटू न दिल्याने पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्याने आत्महत्या करत असल्याचा व्हिडिओ व्हॉट्सअॅपवर पत्नी व इतर नातेवाइकांना पाठवला होता. 


Loading...
सचिन दिनकर कुटे (३०, वडगाव बुद्रुक, रा.पुणे) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी मृताच्या वडिलांनी सिंहगड पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार मामेसासऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

सचिन कुटेचे सलूनचे दुकान आहे. दोघांत वाद झाल्यामुळे त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. नंतर ती मामाकडे राहू लागली. सचिन हा पत्नी व मुलाला भेटण्यासाठी मामेसासऱ्याकडे गेला होता. मात्र त्यांनी त्याला पत्नी व मुलास भेटू दिले नाही. भेटण्याचा प्रयत्न केल्यास खोट्या प्रकरणात अडकवण्याची व मुलास ठार मारण्याची धमकी दिली. 


यामुळे नैराश्यातून सचिनने राहत्या घरी नायलॉनच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने त्याचा व्हॉट्सअॅपवर व्हिडिओ काढला होता. याप्रकरणी १५ ऑक्टोबर रोजी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.