नेवासे तालुक्याचा भावी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नेवासे तालुक्याचा भावी आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचाच असेल, असा दावा राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस व नेवासे मतदारसंघाचे निरीक्षक अंबादास गारूडकर यांनी केला. भेंडा येथे झालेल्या नेवासे तालुक्यातील राष्ट्रवादी बूथ कमिटी पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठकीत गारूडकर बोलत होते. 


Loading...
गारूडकर म्हणाले, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्यात पक्षाचे काम अधिक गतिमान केले जात आहे. प्रत्येक मतदारसंघामध्ये बूथनिहाय कमिट्या नेमण्यात आल्या आहेत. बूथ समन्वयक व पंधरा कार्यकर्ते याप्रमाणे रचना असून त्यांनी त्या-त्या बूथनिहाय मतदारांशी संपर्कात राहून राष्ट्रवादीची ध्येयधोरणे त्यांच्यापर्यंत पोहोचवावीत. 

भाजप सरकारवर टीका करताना गारूडकर म्हणाले, भाजप सरकारने जनतेचा विश्वास गमावला आहे. भाजप सरकारचे अपयश आणि त्यांच्याविषयी जनतेत असलेला असंतोष कार्यकर्त्यांनी विचारात घ्या. शरद पवार आणि राष्ट्रवादी पक्ष हाच शेतकरी, कष्टकरी यांचे हित जोपासत आहेत. शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नेवाशाकडे बारकाईने लक्ष आहे. येथील भावी आमदार हा राष्ट्रवादीचाच असेल. 
----------------------------

अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.