कोपरगाव शहरात दोन समाजाच्या गटांमध्ये राडा


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- कोपरगाव शहरातील पालखी रस्त्याच्या कडेला असलेल्या पथदिव्यांच्या खांबावर लावलेल्या भगव्या ध्वजावर हिरवा झेंडा लावला म्हणून दोन गटांत धुमचक्री उडाली. पोलिसांनी ऐनवेळी केलेल्या हस्तक्षेपामुळे जामाव पांगवल्याने मोठा अनर्थ टळला. 
Loading...

शहरात टिपू सुलतान जयंती साजरी करण्यास हिंदू रक्षक समितीने विरोध केला आहे. या पार्श्वभूमीवर वातावरण तणावपूर्ण असतानाच ही घटना घडल्याने पोलिसांनी दोन्ही गटाच्या तरुणांची धरपकड सुरू केली असून लावलेले झेंडे काढून घेण्याचे आदेश मुख्याधिकारी प्रशांत सरोदे यांनी पालिकेच्या कर्मचाऱ्यांना दिल्यानंतर भगव्या व हिरव्या रंगाचे झेंडे पोलवरून काढून टाकण्यात आले. 


इद ए मिलाद निमित्त शहरात काही मुस्लिम तरुणांनी हिरव्या रंगाचे ध्वज पालखी मार्गाच्या कडेला असलेल्या पथदिव्यांच्या खांबावर लावले. मात्र, या खाबांबर आगोदरच भगवे ध्वज लावण्यात आलेले होते. भगव्या ध्वजाच्या वर हिरवे ध्वज लावल्याने हिंदू रक्षक समितीच्या कार्यकर्त्यांनी यास विरोध दर्शवला. त्यानंतर काही तरुणांनी भगवे ध्वज पुन्हा हिरव्या ध्वजाच्या वर नेवून लावण्याचा प्रयत्न केला. या प्रकाराने दोन्ही गट समोरासमोर येऊन आक्रमक झाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.