अखेर ती चार कलाकेंद्र बंद झाली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  जामखेड तालुक्यातील मोहा हद्दीतील चार कलाकेंद्राबाहेर काही तांत्रिक कारणांमुळे कलाकेंद्र बंद राहील, आदेशावरून, अशा आशयाच्या नोटीस चिटकविल्या आहेत. त्यामुळे सध्या तरी ही चार कलाकेंद्रे बंद झाली आहेत. 

सरकारी आदेशाचा खेळ, ग्रामस्थांचा पुन्हा रास्ता रोकोचा इशारा, बेकायदा कलाकेंद्रांमुळे परिसरात अनेक अवैध धंदे वाढले आहेत. असा आरोप मोहा ग्रामस्थांनी केला होता. त्या अनुषंगाने ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलने केली होती. Loading...
त्या अनुषंगाने अतिरिक्त जिल्हाधिकारी यांनाही बंदचे आदेश दिले होते; मात्र, ही कलाकेंद्रे बंद झालीच नव्हती. यामुळे पुन्हा मोहा ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.