नोकरी मिळेना,लग्न जुळेना.नैराश्यातून उच्चशिक्षित तरुणाची आत्महत्या.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  अकोले तालुक्यातील लिंगदेव गावात एका तरुणाचा मृतदेह शेतामध्ये रामफळाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेमध्ये आढळून आल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे. 

याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार घडलेली हकीगत अशी की, प्रवीण मारुती कानवडे (वय 25) या युवकाने काल सकाळी आठ ते साडे आठ वाजेच्या सुमारास आपल्या शेतातील रामफळाच्या झाडाला दोरीच्या साहाय्याने गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

Loading...
प्रवीण आपल्या कुटुंबासह लिंगदेव गावातील ठाकरवाडी शिवारात राहत होता. वयाची 25 वर्षे उलटून गेली तरी उच्चशिक्षित असूनही नोकरी मिळत नव्हती, यामुळे लग्न जमायला अनेक अडचणी येत होत्या. यामधून आलेल्या नैराश्यातून प्रविणने आपले जीवन संपवले असावे असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. या अचानक घडलेल्या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.