सेनेच्या उमेदवार नगरसेविकेला राष्ट्रवादीने पळविले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शिवसेनेच्या प्रभाग एकमधील उमेदवार दीपाली बारस्कर यांना ऐनवेळी राष्ट्रवादीने पळविले. शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर होऊनही बारस्कर यांनी राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी करण्याचा निर्णय घेतला. यामुळे राष्ट्रवादीच्याच या प्रभागातील उमेदवार मीना चव्हाण यांची धावपळ उडाली. बारस्कर या शिवसेनेच्या विद्यमान नगरसेविका आहेत.
शिवसेनेने पहिल्या यादीमध्ये दीपाली बारस्कर यांना प्रभाग एक सर्वसाधारण महिला गटातून उमेदवारी दिली होती. गेले 12 दिवस त्या प्रभागात प्रचार करत होत्या. शिवसेनेतर्फे उमेदवारी करण्यात येत असल्याचे त्यांनी बहुतांश ठिकाणी सांगितले. राष्ट्रवादीने सर्वसाधारण गटातून मीना चव्हाण यांचे नाव निश्‍चित केले होते. त्यामुळे हे दोघेही एकमेकांच्या विरोधात प्रचार करत होते.


शिवसेनेकडून उमेदवारी जाहीर होऊनही ऐनवेळी राष्ट्रवादीकडून उमेदवारी घेण्याचा प्रकार सलग दुसर्‍या निवडणुकीत घडला आहे. मागीलवेळी महापालिकेतील विरोधी पक्षनेते बाळासाहेब बोराटे यांना शिवसेनेने उमेदवारी जाहीर केली होती. त्यांनीही राष्ट्रवादीशी संधान साधून आणि शिवसेनेला अंधारात ठेवून मागीलवेळी शेवटच्या दिवशी शेवटच्या क्षणाला राष्ट्रवादीकडून अर्ज दाखल करत स्वतःची बिनविरोध निवड केली.
Loading...

त्या घटनेपासून शिवसेनेने धडा घेतला नसल्याचे बारस्कर प्रकरणानंतर समोर आले आहे. यावेळीही बारस्कर कोणत्याही क्षणी राष्ट्रवादीत जाऊ शकतात याची माहिती असतानाही शिवसेना बेफिकर राहिली. त्यामुळे आपला उमेदवार आपल्या बेफिकीरीमुळे राष्ट्रवादीच्या ताब्यात अलगद देण्याची पुन्हा एकदा नामुष्की शिवसेनेवर ओढवली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.