आजपासून उडणार लग्नांचे बार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  शुभ विवाह म्हटले की, समोर येतो एप्रिल व मे महिना. मात्र यावेळी नोहेंबर पासूनच शुभविवाहच्या तारखा आहेत. काही पंचांगात तुलसीविवाहच्या अगोदर मुर्हूत दिल्याचे दिसून येते २१ तारखे पासून विवाह सुरु होत आहे. फेब्रुवारी ते मे पयंर्त जवळपास यावर्षी ७५ शुभ मुर्हूत आहेत.

परंतु कमी झालेला पाउस,नोटबंदीचा परिणाम दुष्काळसदृष्य परिस्थिती यामुळे अर्थकारण मंदावले आहे.त्याचा परिनाम शुभ विवाहच्या संख्येवर परिणाम होतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.. यावेळी मार्च व एप्रिल मध्ये विवाह मुहर्त कमी आहेत. फेब्रुवारी, मे व जून या महिन्यात विवाह तारखा दुप्पट आहेत. 

Loading...
डिसेंबरमध्ये ९ व फेब्रुवारी मध्ये १३ मुहर्त असल्याने डिसेंबरमध्येच विवाह निश्चित करण्याकडे अनेकांचा कल दिसून येतो आहे. फेब्रुवारीच्या कालावधीत मुलांच्या परीक्षा येतात त्यामुळे या महिन्यात विवाह करण्याकडे अनेकांचा कल नसतो. मात्र या वर्षी मुहर्त पाहता सुरुवातीला अधिक विवाह पार पडतील असे दिसून येते. 

कमी अधिक प्रमाणात लग्नाच्या तिथी असल्या तरी दुष्काळाचा परिणाम या विवाहच्या संख्येवर होऊ शकतो. परिनामी सामुदायिक व सध्या पद्धतीने विवाह करण्याचा कल वाढू शकतो. ग्रामीण शेतकऱ्यांचे दुष्काळामुळे पैशाचे गणित चुकलेले आहे त्याचा परिणाम बाजारपेठेवरही होत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.