उद्या होणार आजी-माजी आमदार,नगरसेवकांसह 481 जणांच्या तडीपारीवर निर्णय


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- भाजप आमदार शिवाजी कर्डिले, आमदार संग्राम जगताप, आमदार अरुण जगताप, माजी आमदार व उपनेते अनिल राठोड यांच्यासह 481 जणांच्या तडीपारीचे प्रस्तावावर उज्ज्वला गाडेकर याच्यासमोर सुनावणी अंतिम टप्प्यात असून नवीन प्रस्ताव आता तहसीलदार आप्पासाहेब शिंदे यांच्यासमोर होणार आहे. 

Loading...
तहसीलदार शिंदे यांच्याकडे 38 प्रस्ताव दाखल झाले आहेत. सर्व प्रस्तावावर सुनावणी झाल्यानंतर कारवाईचे आदेश काढण्यात येणार आहेत. उपविभागीय अधिकारी उज्ज्वला गाडेकर यांच्याकडे मनपा निवडणुकीचा पदभार आणि त्यांच्याकडे सादर झालेल्या हद्दपारीच्या प्रस्तावांची सख्या पाहून आजपासून तहसीलदार शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

प्रातांधिकारी गाडेकर यांच्यासमोर काहींची सुनावणी झाली आहे. प्रस्तावांची संख्या जास्त आहे, 481 जणांची सुनावणी व कारवाईचे आदेश गाडेकर काढणार असून यापुढील प्रस्तावांची सुनावणी तहसीलदार शिंदे यांच्यासमोर होणार आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.