भरधाव कंटेनरची धडक बसून श्रीगोंद्यातील शिपायाचा मृत्यू


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहर बायपासवर निंबळक गावाजवळ भरधाव कंटेनरची धडक बसून एक जण जागीच ठार झाला. मधुकर कांबळे (वय ४५, रा. भानगाव, श्रीगोंदा) असे ठार झालेल्याचे नाव आहे. कांबळे नगर तालुक्यातील देहरे येथील नवभारत विद्यालयात शिपाई म्हणून नोकरीला होते.
Loading...

दिवाळीची सुट्टी संपल्यानंतर कांबळे मंगळवारी भानगाव येथून देहरे येथील शाळेकडून मोटारसायकलवरून येत होते. त्यांच्याबरोबर त्यांची एक मुलगी होती. निंबळक शिवारातील बायपास रस्त्यावरून विळद घाटाकडे येत असताना सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकला कंटेनरची धडक बसून ते रस्त्यावर पडले. 


त्याचवेळी त्यांच्या अंगावर ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी बाजूला पडल्याने ती बचावली. कंटेनर चालक वाहन सोडून पसार झाला. बराच वेळ मृतदेह रस्त्यावर पडून होता. त्यानंतर एमआयडीसी पोलिसांनी माहिती दिल्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात आला.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------


Loading...
Powered by Blogger.