निवडणुकी आधीच केडगावमध्ये कॉंग्रेसचे अस्तित्व संपुष्ठात !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी शहरात जोरदार उलथापालट झाली असून सर्वच राजकीय पक्षाची समिकरणेच बदलली आहेत. कॉंग्रेसचा बालेकिल्ला म्हणून समजल्या जाणाऱ्या केडगाव उपनगरावर भाजपने घाला घालून कॉंग्रेसच पूर्णपणे उद्धवस्त केली. 

कॉंग्रेसचे माजी शहर जिल्हाध्यक्ष भानुदास कोतकर समर्थक असलेल्या पाचही कॉंग्रेसच्या उमेदवारांनी अचानक पक्षाची उमेदवारी नाकारून भाजपचे कमळ हातात घेतले. या आठ जणांनी भाजपकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्याने ऐनवेळी कॉंग्रेसला उमेदवार आयात करावे लागले.भाजपमधील नाराजांना कॉंग्रेसला उमेदवारी द्यावी लागली. 

गेल्या दोन ते तीन दिवसांपासून ही घडामोड चालू होती. एकीकडे आघाडीत राष्ट्रवादीबरोबर कॉंग्रेसचे नेते चर्चा करीत असतांना दुसरी कोतकर समर्थकांबरोबर भाजपची चर्चा सुरू होती. राष्ट्रवादीसह कॉंग्रेसच्या नेत्यांनी भानुदास कोतकर याला गृहीत धरून बोली केली. 

Loading...
विशेष म्हणजे कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीच्या रविवारी झालेल्या संयुक्‍त पत्रकार परिषदेत कोतकराचे दोन समर्थक उपस्थित होते. कॉंग्रेसचे युवा नेते डॉ. सुजय विखे यांच्याबरोबरच हे समर्थक आले होते. सोमवारी रात्री उशीरा कोतकर याच्या आदेशानंतर केडगावमध्ये चांगलीच उलथापालट झाली.

आघाडीत केडगावमधील प्रभाग क्रमांक 16 व 17 या दोन्ही प्रभागातील आठही जागा कॉंग्रेसच्या वाट्याला आल्या होत्या. कोतकर याने निश्‍चित केलेल्या आठ उमेदवारांच्या नावाने पक्षाने “एबी’ फार्म तयार केले होते. परंतू आज सकाळी या आठही उमेदवारांनी कॉंग्रेसची उमेदवारी नाकारली. त्यानंतर कॉंग्रेसच्या नेत्यांची चांगलीच धावपळ सुरू झाली. कोतकर याच्या आदेशानंतर केडगावमधील राजकीय समिकरण बदलले. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.