सोने लुटल्याप्रकरणी हिंदू राष्ट्र सेनेच्या पदाधिकार्याविरोधात गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरातील एका सराफ व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या मजुराकडून दहा तोळे सोने लुटल्याच्या गुन्ह्यात कोतवाली पोलिसांनी तपास करून तीन आरोपींना अटक केली. या गुन्ह्यात हिंदू राष्ट्र सेनेचा कार्यकर्ता व माजी पदाधिकारी परेश चंद्रकांत खराडेचे नाव निष्पन्न झाले आहे.
Loading...

परेश खराडे सध्या फरारी झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहे.हिंदू राष्ट्र सेनेच्या खराडे याला काही दिवसांपूर्वी अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्ह्यात अटक करण्यात आली होती. या गुन्ह्यात जामीन मिळाल्यानंतर त्याने दरोड्याचा गुन्हा केला आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी कि, तीन दिवसांपूर्वी गंजबाजारात सराफ कारागीर संजित माणिक मंडल यांच्याकडील दहा तोळे सोने चार जणांनी हिसकावून नेले होते. याप्रकरणी कोतवाली पोलिस स्टेशनला गुन्हा नोंदविला होता.

या गुन्ह्याचा पोलिसांनी तपास करून नगर मधून सचिन सुभाष वाळके (रा. टांगेगल्ली नालेगाव), कलमेश राजेंद्र नवले (वय २२, कुंभारगल्ली), अक्षय बाबासाहेब दातरंगे (वय १९ रा. सातपुते तालीम, नालेगाव) या तिघांना अटक केली. या तिघांना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर हजर केले असता गुन्ह्याच्या तपासासाठी तीन नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनाविण्यात आली आहे.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.