विवाहित महिलेस शिवीगाळ व मारहाण करून विनयभंग.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  विवाहित महिलेस शिवीगाळ व मारहाण करून तीचा विनयभंग केल्याप्रकरणी सोनई पोलिस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.

Loading...
सोनई पोलिसांनी याबाबत माहिती दिली की, संबंधित विवाहित महिला सकाळी आपल्या घराची साफसफाई करत असताना तीस शिवीगाळ, मारहाण करून आरोपींनी लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. महिलेने सोनई पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिल्यानुसार बाळासाहेब रामचंद्र शेटे, सुधीर बाळासाहेब शेटे, सोमनाथ रामचंद्र शेटे, नवनाथ रामचंद्र शेटे (सर्व रा. हनुमानवाडी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.