शेवगावात जुगार अड्ड्यावर छापा,13 जणांना ताब्यात घेतले !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- शेवगाव तालुक्‍यातील हातगाव मुंगी रस्त्यावरील हॉटेल समाधानच्या मागील बाजूस चाललेल्या पत्त्याच्या तिरट नावाच्या हार जितीच्या जुगारावार शेवगाव पोलीसांनी छापा टाकून 13 जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून रोख रक्कम 64 हजार 550 रुपये व दोन लाख 95 हजार रुपये किंमतीच्या अकरा मोटारसायकली व जुगाराचे साहित्य असे एकूण 3 लाख 59 हजारचा ऐवज जप्त करण्यात आला. 
Loading...

सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांना जामिनावर सोडण्यात आले. या संदर्भात पोलीस कर्मचारी हरिभाऊ धायतडक यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन विकास दगडू मगर(रा. गुंतेगाव ता. गेवराई), अब्बास शेख (रा.भगर नांदूर ता. पैठण), बाळासाहेब धोडींराम खंदारे ( रा.बोरगाव ता. गेवराई), ज्ञानदेव अशोक खडसन (रा. आपेगाव ता. पैठण), अशोक विश्वनाथ चौधरी ( रा. हातगाव ता. शेवगाव), शामद शबीर शेख ( रा. मुंगी ता. शेवगाव), दत्ता दगडू जाधव ( रा. बोरगाव ता. गेवराई), दादासाहेब बाबासाहेब साळुंखे (रा.मुंगी ता. शेवगाव), विठ्ठल भानुदास जाधव ( रा. मुंगी ता. शेवगाव), संतोष दशरथ पिटोरे ( रा. पाथरवाला ता. अंबड), दत्तात्रय किसन काटे(मुंगी), विक्रम रामभाऊ शिरसाठ (मुंगी), अहमद समद पठाण (रा.नवगाव ता. पैठण) यांना पोलीसांनी ताब्यात घेतले. 


संबंधीतांनी योग्य जामिन न दिल्याने त्यांची वैदयकीय तपासणी करुन त्यांना अटक करण्यात आली होती. आज त्यांना शेवगाव न्यायालयात हजर केले असता त्यांना जामिनावर सोडून देण्यात आले. पोलीस कर्मचारी बबनराव राठोड पुढील तपास करीत आहेत.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.