'कुकडी'च्या पाण्यासाठी श्रीगोंद्यात शेतकऱ्यांचा रास्ता रोको.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- तालुक्याला कूकडीच्या पाण्याच्या मागणीसाठी सोमवार सकाळी श्रीगोंदा शहरातील संतप्त शेतकऱ्यांनी शहरातील सिद्धेश्वर चौकात दौंड जामखेड रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले.कुकडीचे आवर्तन सुटून एक महिना उलटला तरी अद्याप श्रीगोंद्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळालेले नाही. 
Loading...

त्यामुळे पाण्याअभावी पिकांची राखरांगोळी होत असून सुद्धा पाणी मिळत नसल्यामुळे संतप्त झालेल्या कुकडीच्या लाभार्थी शेतकरऱ्यांनी तब्बल २ तास रस्ता रोको केला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.

यावेळी नगर दक्षिणचे खा.दिलीप गांधी यांनी येत्या दि.२१ तारखेला १३२ चारीला कुकडीचे पाणी सुटेल, असे आश्वासन दिल्यानंतर सदरचे रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी खा.गांधी म्हणाले, धरणात पुरेसे पाणी उपलब्ध असून, एक दिवस एकडे तिकडे होईल. 

पण शेवटच्या घटका पर्यंत पाणी मिळेल.. कुकडी कालव्याला दि.२५ ऑक्टोबरला पाणी सुटले असून अद्याप पर्यंत श्रीगोंदा शहर व तालुक्याला पाणी आले नाही. कुकडी प्रशासन पाणी सुटण्याच्या वेगवेगळ्या तारखा देऊन शेतकरी वर्गाची फसवणूक करत आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.