महानगरपालिका निवडणुकीत सुजय विखे पाटलांची नवी खेळी.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- मनपा निवडणुकीत केडगावमध्ये उमेदवार पळवापळवीला वेगळे वणन लागले आहे. भाजपचे आ.शिवाजी कर्डिले यांनी एकीकडे कॉंग्रेसच्या निष्ठावंतांना आपल्या गोटात ओढले आहे. तर दुसरीकडे कॉंग्रेसच्या डॉ.सुजय विखे यांनी भाजपातील नाराजांची मोट बांधली असून कॉंग्रेसच्या तिकीटावर उमेदवारी देण्यासाठी संपर्क साधला आहे. 
Loading...

महानगरपालिकेच्या उमदेवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी वेगळेच वळण लागले. केडगाव येथील कोतकर समर्थकांना भाजपने ऐनवेळी गळाला लावल्यामुळे एकीकडे कॉंग्रेसवर उमेदवार शोधण्याची वेळ आली तर, दुसरीकडे भाजपचे येथील निष्ठावान सैरभैर झाले. त्यांना उमेदवारी डावलल्यामुळे एकच खळबळ उडाली.


एकापाठोपाठ या घटना घडत असताना कॉंग्रेसचे नेते डॉ.सुजय विखे लगेचच भाजपच्या नाराज निष्ठावानांशी संपर्क साधून त्यांना कॉंग्रेसची उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू केल्याचे समजते. ते विळद घाटातच तळ ठोकून आहेत. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ जशी संपत आली तशी या हालचालींना प्रचंड वेग आला. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.