मनपाची सत्ता ताब्यात घेण्याची आमदार कर्डिलेंवर जबाबदारी !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  मुंबईत वरिष्ठ पातळीवर झालेल्या निर्णयानुसार महापौरपदाची जबाबदारी कर्डिलेंवर टाकण्यात आल्याचे समजते.भाजपच्या निवडणूक कोअर कमिटीत कर्डिले यांचा यंदा समावेश झालेला नाही. त्यामुळे मनपा निवडणुकीच्या हालचालीतून सुरुवातीला ते अलिप्त होते. 

मात्र गेल्या चार-पाच दिवसांपासून कर्डिले सक्रिय झाले. त्यानंतरच केडगावबाबतच्या हालचालींना वेग आला. राष्ट्रवादीनेही केडगावबाबत कमालीची सावधगिरी बाळगली होती.भानुदास कोतकर समर्थकांना भाजपच्या चिन्हावर उभे करण्याच्या घडामोडी काल दुपारपासून वेगाने सुरू झाल्या. भाजपच्या एका नेत्याने ही नवी खेळी केली. 
Loading...

याबाबत मुंबईत ‘वर्षा’ बंगल्यावर या नेत्याने चर्चा केली. ‘वर्षा’वरून हिरवा कंदिल मिळताच केडगावमध्ये घडामोडींना वेग आला.त्यानंतर कोतकर समर्थकांना भाजपची उमेदवारी देण्यात आली. महापौरपदासह चा हा प्रयत्न असून, त्याचाच एक भाग म्हणून उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज हा धक्का देण्यात आला. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.