श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले तालुक्यांचा दुष्काळात समावेश करा - नितीन उदमले


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळामुळे हवालदिल झाला आहे. शेतकऱ्यांवर हे मोठे संकट कोसळले आहे. सरकारने सर्वेक्षण करून महाराष्ट्राच्या दुष्काळसदृश्य परिस्थितीचा आढावा घेतला. शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले.

Loading...
श्रीरामपूर, कोपरगाव, अकोले या तालुक्यांमध्ये दुष्काळ जाणवत आहे. मात्र, हे तालुके दुष्काळी यादीत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला आहे. ऊसाच्या पिकावरील हुमणी अळीच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी अडचणी सापडले आहेत. 

त्यामुळे या तालुक्यातील नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना साहाय्य करावेत, अशी विनंती माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन उदमले यांनी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यकारी अधिकारी विजय भारतीय यांना निवेदनाद्वारे केली. 

सरकारने नुकतीच दुष्काळसदृश तालुक्यांची यादी जाहीर केली. पण त्यात श्रीरामपूर, कोपरगाव आणि अकोले या तीन तालुक्यांचा समावेश नाही. या तालुक्यांतही पावसाचे प्रमाण अतिशय कमी आहे. जनावरांच्या चाऱ्याचा, शेतीच्या व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

तीव्र दुष्काळामुळे शेतकरी चिंतेत आहे. त्यामुळे सरकारने यात हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा. या तालुक्यातील परिस्थिती भयावह असून इथे सरकारी उपाययोजनांची आवश्यकता आहे. तांत्रिक कारणांमुळे या तालुक्यांचा समावेश राहून गेला आल्यास त्याचा पुनर्विचार व्हावा आणि या तालुक्यांना न्याय मिळावा, अशी विनंती उदमले यांनी केली आहे.

नगर जिल्ह्यातही ऊस पिकांवर हुमणी अळीचा हल्ला झाला असून साधारणपणे ३८ हजार हेक्टर्स क्षेत्र हे पूर्णतः बाधित झाले आहे. त्यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला आहे. यामुळे हजारो शेतकरी कुटुंब अडचणीत आली आहेत, तरी या नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना साहाय्य करावे, अशी विनंती उदमले यांनी केली आहे.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.