खोटी माहिती दिल्याने उपसरपंचावर गुन्हा दाखल.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- संगमनेर तालुक्यातील माळेगाव हवेली येथील उपसरपंच रावसाहेब नामदेव जंबूकर यांनी निवडणूकी संदर्भात खोटी माहिती देत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी त्यांच्या विरूद्ध शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
Loading...

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोमवार दि.१७ ऑगस्ट २०१५ रोजी माळेगाव हवेली येथील ग्रामपंचायतीची सार्वत्रिक निवडणूकीत सदस्यपदाचा अर्ज भरताना रावसाहेब जंबुकर यांनी आपल्या दोन अपत्य असल्याचे घोषणापत्र दाखल केले होते. 

पण मंडल अधिकारी दिलीप माधव पवार यांनी चौकशी केली असता जंबुकर याला तीन अपत्य असल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी खोटे घोषणापत्र दाखल करत शासनाची फसवणूक करून शासनाच्या प्राधीकृत अधिकार्यास निवडणूकी संदर्भात खोटी माहीती देणे व शपथेवर खोटी माहीती देवून शासनाची फसवणूक केली आहे. 

त्यामुळे समनापूर येथील मंडल अधिकारी दिलीप माधव पवार (रा. मालदाड रोड,संगमनेर) यांनी दिलेल्या फियार्दीवरून शहर पोलिसांनी रावसाहेब जंबुकर यांच्या विरूध्द गुन्हा रजिस्टर नंबर ३९९/२०१८ भादंवि कलम ४२०, १७१ जी ,१७७, १८१ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.