प्रचार करणाऱ्या आमदाराच्या गळ्यात घातला चपलांचा हार !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी गेलेल्या भाजपचे आमदार दिलीप शेखावत यांच्या गळ्यात एका व्यक्तीने चपलांचा हार घातल्याच प्रकार मध्य प्रदेशातील नागदा येथे घडलाय. निवडणुकीची धामधुम सुरू असताना घडलेल्या या प्रकारामुळे नागद्यात वातावरण तापलं आहे.
Loading...

मध्य प्रदेशात अनेक ठिकाणी निवडणुकीच्या प्रचारासाठी जाणाऱ्या उमेदवारांची मतदारांकडून प्रश्नांची सरबत्ती होत आहे. त्यातच हा प्रकार राज्यातील नागदा जिल्ह्यातील खाचरोद मतदारसंघात घडलाय. खाचरोद मतदारसंघातून भाजपा आमदार दिलीप शेखावत निवडणूक लढवत आहेत. सोमवारी संध्याकाळी पक्षाचा प्रचार करणाऱ्यासाठी ते गेले असता एका व्यक्तीने त्यांना चपलांचा हार घातला.

सोमवारी सायंकाळी ते खाचरोद या आपल्या मतदारसंघात प्रचारासाठी गेले होते. मतदारांच्या भेटी-गाठी घेत असताना, अचानक समोरून आलेल्या एका व्यक्तीने त्यांच्या गळ्यात चपलांचा हार घातला. सुरुवातीला आमदार महोदयांना काय करावे काहीच कळले नाही. मात्र, गळ्यात चपलांचा हार पाहताच संतप्त झालेल्या आमदारांनी त्या व्यक्तीला मारहाण केली. त्यानंतर दोघांमध्ये बराच वेळ वादावादी देखील सुरू होती.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.