साई संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- साईबाबांच्या दानपेटीतील ५० कोटी आधी विदर्भातील सरकारी रुग्णालयांसाठी दिले. आता मुख्यमंत्री निधीसाठीही ५० कोटी देण्याचा निर्णय झाला. याचा जाब संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे यांना विचारण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी प्रवेशद्वारातच अडविले. त्यातील काहींनी कुंपनावरून उड्या मारून हावरे यांच्या गाडीच्या काचा फोडल्या. या कारणाने पोलिसांनी १७ जणांना ताब्यात घेतले. रात्री उशिरापर्य़ंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Loading...
मुख्यमंत्री सहायता निधीसाठी ५० कोटी रुपये देण्याचा निर्णय घेतल्याने शिर्डीकरांमध्ये प्रचंड असंताेष अाहे. त्यातच गुरुवारी पुन्हा बैठक हाेत असल्याने तेथे जाऊन विश्वस्तांना जाब विचारण्याचा निर्णय काँग्रेस कार्यकर्त्यांनी घेतला. त्यानुसार कैलासबापू कोते यांच्या नेतृत्वाखाली ते बैठकीच्या ठिकाणी घोषणा देत जात होते. तितक्यात संस्थान व पाेलिस प्रशासनाने त्यांना गेटवरच अडवले. तेथे हावरे आणि विश्वस्तांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. 

दरम्यान, आम्हाला गेटवर अडवता मग भाजपचे लोक आत कसे? त्यांना बाहेर काढा, असा पवित्रा काँग्रेसच्या आंदोलनकर्त्यांनी घेत पोलिस प्रशासनाचा निषेध केला. तरीही भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिस बाहेर काढत नसल्याने आक्रमक कार्यकर्त्यांनी साई संस्थानचे अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे यांच्या कारवर हल्ला चढवला. दहा मिनिटे चाललेल्या या आंदोलनाने सर्वत्र पळापळ सुरू झाली. अखेर पोलिसांनी सर्वांना ठाण्यात नेल्यावर वातावरण शांत झाले.
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.