आगामी लोकसभा निवडणुकीसाठी सज्ज.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- आगामी लोकसभा निवडणुकीच्या संबंधाने प्रत्येक यंत्रणेने निवडणुकीबाबत विभागावर सोपवलेली जबाबदारी गांभीर्याने पार पाडावी, असे निर्देश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवन सभागृहात लोकसभा निवडणुकीच्या कामाचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते.
Loading...

आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जिल्हा निवडणूक शाखेने जोरदार तयारी सुरू केली आहे. या संदर्भात जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी द्विवेदी यांनी घेतली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी प्रशांत पाटील, उपजिल्हाधिकारी ज्योती कावरे, संदीप आहेर, जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप निचित यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्ह्यात दोन लोकसभा मतदारसंघ असून, एकूण मतदान केंद्रसंख्या ३ हजार ७२२ आहे. निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्यावर वेगवेगळ्या कामकाजासाठी आणि व्यवस्थापनासाठी मनुष्यबळाची आवश्यकता लागणार असून, किमान २५ हजार अधिकारी-कर्मचाऱ्यांची गरज भासणार आहे. कामकाज करण्यासाठी विविध विभागांचे अधिकारी-कर्मचारी नियुक्त केले जाणार असून, त्यासाठी संबंधित विभागांकडून अधिकारी-कर्मचाऱ्यांची माहिती मागविण्यात आली आहे, अशी माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी अरुण आनंदकर यांनी दिली.

----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Loading...
Powered by Blogger.