श्रीगोंद्याच्या सिंघमची राजकीय दबावातून बदली.


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :-  श्रीगोंदा तालुक्याचे सिंघम अशी उपमा मिळालेले व श्रीगोंदा पोलीस स्टेशन हद्दीत कायदा सुव्यवस्थेचा धाक निर्माण करण्यासोबतच, पोलीस स्टेशनला आयएसओ मानांकन मिळवून देणारे व सामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आग्रही असणारे श्रीगोंदा पोलीस निरीक्षक बाजीराव पोवार यांची नुकतीच पारनेर येथे बदली झाली. परंतु पोवार यांच्या तडकाफडकी बदलीमुळे सामान्य नागरिकांत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. 
Loading...

एका प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याची अशी अचानक बदली झाल्याने सर्वच स्तरातून संताप व्यक्त होत आहे. राजकीय दबाव झुगारून देत सत्ताधारी पक्षाच्या एका बड्या नेत्याच्या कार्यकर्त्यावर केलेल्या कारवाईमुळे, दुखावलेल्या या नेत्याने आपल्या पदाचा वापर करून पोवार यांची बदली केल्याची तालुक्यात सर्वत्र चर्चा आहे.


पोवार यांना पदभार घेऊन सव्वा वर्षेच झालेले असताना कार्यकाल पूर्ण होण्यासाठी अजून वेळ असतानाही बदली कशी झाली. पोवार यांच्या बदलीविरोधात काही प्रतिष्ठीत नागरिकांनी पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन त्यांची बदली रद्द करण्याबाबत देखील चर्चा देखील केली.आपले कर्तव्य चोख बजावणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याची अशी बदली झाल्यामुळे या बदलीच्या विरोधात नागरिकांत तीव्र नाराजीचा सूर आहे..
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------

Loading...
Powered by Blogger.