महापालिकेची आचारसंहिता लागल्याने उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा मुहूर्त हुकला !


अहमदनगर लाईव्ह24.कॉम :- नगर शहरातील उड्डाणपुलाच्या भूमिपूजनाचा ३ नोव्हेंबरचा मुहूर्त महापालिकेची आचारसंहिता लागल्यामुळे हुकला आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री नगर शहरात येणार असल्यामुळे भाजपकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले होते. मात्र, आचारसंहिता लागल्यामुळे हे सर्व कार्यक्रम रद्द होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

Loading...
महापालिका निवडणुकीची आचारसंहिता १ नोव्हेंबरपासून लागू झाली आहे. आचारसंहितेच्या कालावधीत कुठलेच भूमिपूजन करता येत नाही. भाजपचे खासदार दिलीप गांधी यांच्या पुढाकारातून नगर शहरात होत असलेल्या उड्डाण पुलाचे भूमिपूजन मुख्यमंत्र्यांचे हस्ते होणार होते.आचारसंहिता लागण्यापूर्वी हे भूमिपूजन करायचा मनसुबा गांधी यांनी बांधला होता. मात्र, आचारसंहिता लागल्यामुळे हा मनसुबा उधळला गेला आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३ नोव्हेंबरला नगर शहरात येऊन या प्रस्तावित उड्डाणपुलाचे भूमिपूजन करणार होते. नगर शहरातील रस्ते अपुरे पडत असल्यामुळे होणारी वाहतूक कोंडी, तसेच सतत होणारे छोटे-मोठे अपघात रोखण्यासाठी नगर शहरात उड्डाणपूल होणार आहे. यापूर्वी देखील या उड्डाणपुलाचे काँग्रेस-राष्ट्रवादीच्या काळात तीन वेळा भूमिपूजन झाले होते. 
----------------------------
अहमदनगर ब्रेकिंग न्यूज अपडेट्स साठी आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि ट्वीटर वर फॉलो करा.
--------------------------------
Powered by Blogger.